Marathi Jokes | मराठी विनोद, भन्नाट मराठी जोक्स मराठी जोक्स म्हणजे मराठी भाषेत सांगितले जाणारे विनोद. निराशा हा असा आजार आहे की एकदा कुणालाही त्याचा फटका बसला की तो बाहेर येणे खूप कठीण होते.
आपण रोजच्या आयुष्यात इतके धकाधकीचे आयुष्य जगत असतो आणि इतके तणावात असतो की आपल्याला रोजच्या जगण्यात थोडं हसू गरजेचे असते.
मराठी विनोदी जोक्स आपल्या तणावग्रस्त आयुष्यात थोडा हलकेपणा घेऊन येतात याचा परिणाम आपल्या मनावर इतका चांगला होतो की किमान काही वेळासाठी का
असेना आपण तणावमुक्त नक्कीच होतो. निराशेतून बाहेर पडण्यासाठी पोट धरून खूप हसविणारे काही मजेशीर आणि भन्नाट मराठी जोक्स, Marathi Jokes | मराठी विनोद, भन्नाट मराठी जोक्स
आम्ही तुमच्यासाठी आणले आहेत. जरूर वाचा व आवडल्यास जरूर शेअर करा.
Marathi Jokes | मराठी विनोद, भन्नाट मराठी जोक्स
बायकांनी भरलेल्या एका बसचा अपघात होतो.
सगळ्यांचा त्यात मृत्यू होतो. सगळे नवरे जवळपास एक आठवडा रडत होते.
गण्या मात्र २ आठवडे होऊन गेले तरी अजुन रडतच होता.
मित्रांनी खूप खूपच खोदून-खोदून विचारल्यावर कारण कळलं…..
त्याच्या बायकोची बस चुकली होती
संता – आज मी बायकोला वाचमैन बरोबर पिक्चर बघायला जाताना पाहिले.
बंता – मग तू माग नाही गेलास?
संता – नाही यार, तो पिक्चर मी पहिलेच बघितला आहे.
नवरा: काल रात्री माझ्या स्वप्नात एक सुंदर मुलगी आली होती.
बायको:एकटीच आली असेल
नवरा: हो तुला कस माहीत?
बायको: कारण तिचा नवरा माझ्या स्वप्नात आला होता…
बायको : कशी दिसते मी ?
हे पण वाचा :
मित्र सखा सोबती सवंगडी असा अनेक नावानी आपण आपल्या मित्रांना जाणतो. त्यांना सुद्धा Birthday Wishes for Friend in Marathi येथे क्लिक करा. व मित्राला भरभरून वाढदिवस शुभेच्छा
मराठी भाषेत आईला “आई” असे म्हणतात. हा शब्द संस्कृत शब्द “मातृ” यापासून आला आहे, ज्याचा अर्थ “माता” आहे.
“आई” हा शब्द प्रेम, स्नेह आणि बलिदानाचे प्रतीक आहे. तिला सुद्धा Birthday Wishes for Mother in Marathi येथे क्लिक करा. व आईला भरभरून वाढदिवस शुभेच्छा
नवरा : एकदम Piyanka Chopra सारखी दिसतेस
बायको : खरंच? DON वली कि KRISH वाली?
नवरा : BURFI वाली
मग काय, बायको ने धुतला MARY KOM बनून😀
प्रिये, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो.
बायको : (लटक्या रागाने) अस्सं काय, मी नाही का करत तुमच्यावर प्रेम?
मी तर तुमच्यासाठी सगळ्या जगाशी लढू शकते.
नवरा : मग दिवसरात्र माझ्याशी का भांडतेस?
बायको : अहो, तुम्हीच तर माझं जग आहात.
नवरा- माझ्या छातीत खुप
दुखायला लागलय, ताबडतोब अँब्युलस
ला फोन लाव…
बायको- हो लावते हां, तुमच्या मोबाईल
चा पासवर्ड सांगा !!!
नवरा- राहु दे, थोङ बरं वाटतय
मला आता…
एका मैत्रिणीने Hi पाठवलं.
मी पण रीप्लाय दिला
Hi म्हणून..
तिने विचारलं काय चालु आहे.
मी रीप्लाय दिला.
२ ट्युब लाइट.. १ फॅन.. १ टीव्ही.
१ मोबाइल अणि तु..
डायरेक्ट ब्लॉक केलं ना राव!
मास्तर : इंडिया गेट काय आहे?
मुलगा : बासमती तांदूळ.
मा : चारमिनार?
मु : सिगरेट.
मा : ताजमहाल?
मु : चहा.
मा : गाढवा! देशातील इतकी प्रख्यात स्थळं तुला माहिती नाहीत.
जा, तुला नापास केलं. उद्या येताना वडिलांची सिग्नेचर आण.
एक विवाहीत स्त्री स्वत:च्याच
जिभेवर हळद, कुंकु नि अक्षदा
लावत होती तेवढ्यात.
नवरा : अगं हे काय करतेस?
बायको : अहो दसरा आहे ना आज !
म्हणुन शस्त्राची पुजा करतेयं.
मुलगी: माझे हृदय म्हणजे माझा
मोबाईल आहे आणि तू त्यातले
सिमकार्ड म्हणजेच जीव आहेस..
मुलगा: राणी एक विचारू ?
मुलगी: हो विचार ना..
मुलगा: मोबाईल डबल सिमचा तर नाही ना ?
आई: बेटा तू केस का कापत नाही?
मुलगा: फॅशन आहे आई
आई: गाढवा तुझ्या ताईला पाहून गेलेल्या पाहुण्यांचा निरोप आलाय
लहान मुलगी पसंद आहे म्हणून,
आता जा नांदायला.
हे पण वाचा :
नवीन दिवसाची नवी सुरुवात झाली आहे. हा दिवस तुमच्यासाठी खूप आनंददायक आणि यशस्वी असो. तुमच्या सर्व योजना यशस्वी होवोत आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मकता भरु दे.
Good Morning Messages in Marathi येथे क्लिक करा.
आज आम्ही तुमच्यासाठी काही चांगले Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी मराठी सुविचार येथे क्लिक करा. जे तुम्हाला कदाचित खूप आवडतील.
हे बघा
एडमिन साहेब…
ग्रुप मधे AC लावा
उनाळा सुरु होतोय..
नाहि तर आंदोलन करण्यात येईल.
काही लोक फोन केल्यावर
म्हणतात की,
काय ओळखला का आवाज…
आता हा काय अजित सिंग आहे
व्हय ह्याचा आवाज ओळखायला…
काय लोकपण कमालीची
असतात….
नवरा: काल रात्री माझ्या स्वप्नात एक सुंदर मुलगी आली होती.
बायको:एकटीच आली असेल
नवरा: हो तुला कस माहीत?
बायको: कारण तिचा नवरा माझ्या स्वप्नात आला होता…
अचानक कोणीतरी – काय मग,
काय चालू आहे सध्या?🤔
Le मी – साडेसाती!….
“गायीच्या पोटात तेहतीस कोटी देव आहेत हे
जरी खरे मानले,
तरी येता- जाता तिच्या पोटाला हात लावून सारखा नमस्कार करू नये,
तिला गुदगुल्या होतात..”
जोशीकाका: काय तात्या, आज अगदी आनंदात दिसता आहात ! काय झालं ?
तात्या: अहो, आमच्या शेजारच्या कुलकर्ण्यांना १ लाख रुपयाची लॉटरी लागलीये!
जोशीकाका: मग तुम्हाला का इतका आनंद झालाये?
तात्या: त्याला आता तिकिट सापडत नाहीये !
एक ज्योतिषी इंजिनीअरिंग करणा-या विद्यार्थ्याचा हात पहात होता.
ज्योतिषी: बेटा, तू खूप खूप शिकणार आहेस..
विद्यार्थी: ते माहितीय हो…गेल्या ८ वर्षांपासून मी शिकतोच आहे.
मला सांगा, मी पास कधी होणार?
काही शहाण्या मुलींचे फेसबुक आणि व्हॉट्सऍप वरील स्टेटस
My dad is my real hero
मग आमच म्हातार काय
नीळू फुले आहे का
अगर कभी टूट कर बिखर जाओ तो मुझे याद
कर लेना .
क्यों की मेरे पास रुपये 5/-
वाला fevi-quick बेकार पड़ा है.
सासू: कित्ती वेळा सांगितलंय
बाहेर जातांना टिकली लावत जा
सूनबाई: अहो सासूबाई, जीन्सवर
कुणी टिकली नाही लावत
सासू: अगं जीन्सवर नाही,
कपाळावर लाव, भवाने !
पुणेकर : काका पावशेर रताळे द्या
दुकानदार : पिशवीत देऊ?
पुणेकर : नाही नाही, पेन ड्राईव्ह आणलाय.
त्यात “रताळे” नावाचा फोल्डर बनवा आणि टाका त्यात.
गुरुजी- दळणवळण म्हणजे काय?
विद्यार्थी- एखादी मुलगी दळण घेऊन
जाताना वळून पाहते त्याला दळणवळण म्हणतात.
गुरुजी राजीनामा देऊन आषाढी वारीला निघालेत.
पूर्वी तुम्ही प्रेमाने मला,माझी रसमलाई,
माझी रबडी माझी बर्फी म्हणायचे
आता का तसं म्हणत नाही?🤔
दुधाचे पदार्थ किती
दिवस ताजे राहणार…🙆
हे पण वाचा :
प्रेमामध्ये कोणत्या गोष्टी असणे महत्वाचे आहे अंतःकरण, उत्सुकता, विश्वास, सहानुभूती, आदर, प्रेम वेगवेगळ्या प्रकारे प्रकट होऊ शकते.
मित्रानो आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत १०० पेक्षा जास्त Love Quotes in Marathi | मराठी लव शायरी संग्रह येथे क्लिक करा.
जर तुम्ही तुमच्या पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अभिनंदन संदेश शोधत असाल, तर आम्ही या लेखात Birthday Wishes for Husband In Marathi | नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा येथे क्लिक करा.
कोणाला तरी प्रेमातला विरह जाळून टाकतो
कोणाला तरी प्रेयसीचा नकार विझवून टाकतो
आणि या सगळ्यातून जो वाचतो त्याला
परिक्षेचा आभ्यास मारून टाकतो.
पूर्वी लोक कमी आजारी पडत मुख्य कारण म्हणजे
आधी लोक जेवण घरी करत आणि संडासला बाहेर जात.
आता लोक संडासला घरात आणि जेवायला बाहेर जातात.
बायको : आहो ऐकले का?
नवरा : काय?
बायको : या वर्षी हळदी कुंकूला मी बायकांना काय देऊ?
नवरा: माझा नंबर दे
लय धुतला बायकोने त्याला
जर घरात घुसताना वरांड्यात एखादी नाजुक लेडीज चप्पल दिसली,
तर,
कोणताही माणुस, डोक्यावरचे केस सावरल्या शिवाय आत जात नाही…
संस्कार हो…. आणखी काय 😀
परीक्षेमध्ये मास्तर खुप कडक असतो आणि पेपर पण कठीण असतो….
चिटीँग पण करता येत नसते.
शेवटचा बेँचवर बसलेल्या गण्याने
परीक्षकाला एक चिठ्ठी दिली.
परीक्षकाने चिठ्ठी वाचली आणि चुपचाप
आपल्या खुर्चीवर जाऊन बसला.
गण्याचा पुढे बसलेल्या मिञाने विचारले
यार तु काय लिहल होत त्या चिठ्ठीत?
गण्या: “सर, तुमची पँट मागून फाटली आहे….”
शिक्षकाने विद्यार्थ्यांना चार पानी निबंध लिहायला सांगितला.
विषय होता, ‘आळस म्हणजे काय?
एका विद्यार्थ्याने चारही पानं कोरी ठेवली आणि शेवटी फक्त तीनच शब्द लिहीले.
‘यालाच म्हणतात आळस.’
माणूस: डॉक्टरसाहेब, तुम्हाला टाके घालता येतात का?
डॉक्टर: हो येतात की. कशाला घालायचे आहेत?
माणूस: ही घ्या चप्पल. हिचा बंद तुटलाय, जरा टाके घालून द्या.
तो तिला म्हणाला,
जीना सिर्फ मेरे लिए !
ती म्हणाली,
ठीक आहे मी लिफ्ट ने जाते,
तू ये जिन्याने.
गुरूजी : एक बाई एका तासांत 50 पोळ्या बनवत असेल,
तर तीन बायका एका तासांत किती पोळ्या बनवतील ?
बंड्या : एकही नाही. कारण,
ती एकटी आहे म्हणूनच तर काम करते.
तिघीजणी मिळून फक्त गप्पा मारतील.
एक प्रेगनंट बाई पुरुष डॉक्टर कडे जाते.
डॉक्टर : काय बाई, कितवा महिना?
बाई (लाजून) : इश्य !, आठवा.
डॉक्टर (आणखी लाजून) : अहो, मी कसा आठवू? तुम्हीच आठवा !
बाबा : काल रात्री कुठे होतास?
मुलगा : मीत्रा च्या रुम वर ग्रुप स्टडी करत होतो.
बाबा : रात्रीची ऊतरली नाही तुझी बेटा.
मुलगा : काय ?
बाबा : तुला नौकरी लागुन चार वर्ष झाली बेवड्या
शिक्षक : पृथ्वीवरचा सर्वात जुना प्राणी कोणता ?
विद्यार्थी : झेब्रा.
तो अजून ब्लॅक अँड व्हाईट आहे.
Pinterest Images साठी येथे क्लिक करा.