Marathi Ukhane For Female | मराठी उखाणे नवरीसाठी नवरी हा मराठी भाषेत विवाहित स्त्रीला म्हणतात. मराठी संस्कृतीत लग्न हा एक महत्त्वाचा जीवनप्रसंग मानला जातो आणि नवरीची विशेष पूजा केली जाते. लग्नाच्या दिवशी नवरी पारंपारिक पोशाख घालते आणि तिच्यावर खूप दागिने घातले जातात. तिला गजरा, फुलांच्या माळा आणि इतर सौंदर्यप्रसाधने घातली जातात.
महिला उखाणे घेण्यासाठी खूप उत्सुक असतात. नवीन प्रकारचे उखाणे तुम्हाला पहायला मिळतील. Marathi Ukhane For Female | मराठी उखाणे नवरीसाठी तुम्ही आपल्या मित्रपरिवारांसोबत शेयर करू शकता. तुम्हाला या वेबसाइट वर सर्व प्रकारचे उखाणे भेटतील.
Marathi Ukhane For Female | मराठी उखाणे नवरीसाठी
जीवनाच्या वाटेवर पाऊल नवीन ठेवते
सगळ्यांचा मान राखून …………… रावांचे घेते.

काचेच्या बशीत आंबे ठेवले कापुन
रावांचे ………..घेते सर्वांचा मान राखुन

आकाशाच्या अंगणात चंद्राची रोहिणीला लागली चाहूल
…………..रावांच्या जोडीने संसारात टाकते पाऊल

मंगळसुत्रातील दोन वाटया सासर आणि माहेर
………………रावांनी दिला सौभाग्याचा आहे

इन्द्रधनुष्य दिसतो जेव्हा असतं पावसात ऊन
…………..रावांचे नाव घेते ची मी सुन

सोन्याची अंगठी रुप्याचे पैंजण
………….रावांचे नाव घेते ऐका सारेजण

शिवाजी महाराजांना जन्म देणारी धन्य जिजाऊमाता
……………..रावांचे नाव घेते आपल्या शब्दा करिता

सासरच्या कौतुकात राहील नाही काळाच भान
…………रावांचे नाव घेते राखून सर्वांचा मान

तुळजाभवानीची कृपा आणि तिरुपतीचा आशिर्वाद
माहेरचे निरंजन आणि सासरची फूलवात
……………..रावांचे नाव घेउन करते मी संसाराला सुरूवात

हजार रुपये ठेवले चांदीच्या वाटीत
………..रावांचे नाव घेते लग्नाच्या वरातीत

देवब्राम्हण अग्नीसाक्षीने घेतले मी सात फेरे
…………रावांचे व माझे जुळले जन्मोजन्मीचे फेरे

दारात अंगण अंगणात काढली रांगोळी
………..रावांचे नाव घेऊन बांधते मुंडावळी

मंगलदेवी मंगलमाता वंदन करते तुला
……………रावांचे नाव घेते अखंड सौभाग्य दे मला

फुलले गुलाब गाली स्पर्शात धुंद झाली प्रीती
……………..रावांची झाले मी जन्मोजन्मीची सौभाग्यवती

जन्म दिला मातेने पालन केले पित्याने
………..रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने

आकाशाच्या प्रागंणात ब्रम्हा विष्णू आणि महेश
…………..रावांचे नाव घेऊन करते मी गृहप्रवेश

रुप्याची साडी तिला सोन्याचा गिलावा
…………..रावां सारखा नवरा मला जन्मोजन्मी मिळावा

एक तीळ सातजण खाई
…………रावांना जन्म देणारी धन्य ती आई

उंबरठ्यावरील माप देते सुखी जीवनाची चाहूल
………………रावांच्या जीवनात टाकते मी आज पहिले पाऊल

तिरंगी झेंड्याला वंदन करतात वाकून
………रावांचं नाव घेते तुमचा मान राखून

हे पण वाचा :
मित्र सखा सोबती सवंगडी असा अनेक नावानी आपण आपल्या मित्रांना जाणतो. त्यांना सुद्धा Birthday Wishes for Friend in Marathi येथे क्लिक करा. व मित्राला भरभरून वाढदिवस शुभेच्छा
मराठी भाषेत आईला “आई” असे म्हणतात. हा शब्द संस्कृत शब्द “मातृ” यापासून आला आहे, ज्याचा अर्थ “माता” आहे.
“आई” हा शब्द प्रेम, स्नेह आणि बलिदानाचे प्रतीक आहे. तिला सुद्धा Birthday Wishes for Mother in Marathi येथे क्लिक करा. व आईला भरभरून वाढदिवस शुभेच्छा
नवीन दिवसाची नवी सुरुवात झाली आहे. हा दिवस तुमच्यासाठी खूप आनंददायक आणि यशस्वी असो. तुमच्या सर्व योजना यशस्वी होवोत आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मकता भरु दे.
Good Morning Messages in Marathi येथे क्लिक करा.
आज आम्ही तुमच्यासाठी काही चांगले Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी मराठी सुविचार येथे क्लिक करा. जे तुम्हाला कदाचित खूप आवडतील.
प्रेमामध्ये कोणत्या गोष्टी असणे महत्वाचे आहे अंतःकरण, उत्सुकता, विश्वास, सहानुभूती, आदर, प्रेम वेगवेगळ्या प्रकारे प्रकट होऊ शकते.
मित्रानो आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत १०० पेक्षा जास्त Love Quotes in Marathi | मराठी लव शायरी संग्रह. येथे क्लिक करा.
जर तुम्ही तुमच्या पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अभिनंदन संदेश शोधत असाल, तर आम्ही या लेखात Birthday Wishes for Husband In Marathi | नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा येथे क्लिक करा.
काश्मिरच्या नंदनवनात फुलतो निशिगंध
………रावांच्या जीवनात निर्माण करीन आनंद

प्रेमरूपी संसार संसार रूपी सरिता
……….रावांचं नाव घेते खास तुमच्याकरिता

श्रीरामाच्या पउली वाहते फूल आणि पान
………..रावांचे नाव घेऊन राखते सर्वाचा मान

गोपाळ कृष्ण आहे बासरीचा छंद
………..रावांचे नाव घेण्यात मला वाटतो आनंद

अगं अगं मैत्रीणीबाई तुला सांगते सर्व काही
……….राव मिळाले तरी तुला विसरत नाही

पौर्णिमेच्या रात्री आकाशात प्रकाशते पूर्ण चंद्रबिंब
……….रावांचे नाव घेण्यास लावत नाही विलंब

पाकळी पाकळी उमलून फूल होतं आकार
……..रावांसारखे पती मिळाले स्वप्न झाले साकार

नाही मोठेपणाची अपेक्षा नाही दौलतीची इच्छा
………..रावांच्या संसारी असाव्या सर्वांच्या शुभेच्छा

आकाशाच्या पोटी चंद्र सूर्य तारांगणे,
………..रावांचे नाव घेते तुमच्या म्हणण्याप्रमाणे

पावसाच्या पहिल्या सरीने भिजते चातकाची काया,
………… च्या साठी सोडले आई-वडिलाचे घर, तरी सुटत नाही माया.

चंदनाच्या झाडाखाली हरिणी घेते विसावा,
……. रावांचे नाव घेते आशिर्वाद असावा

Pinterest Images साठी येथे क्लिक करा.
चंदनासारखे झिजावे, उदबत्तसारखे जळावे,
……….. रावांना औक्ष मिळो हे देवापाशी मागावे.

नागपूरची संत्री, जळगावची केळी,
………… रावांचं व माझे ‘शुभमंगल’ झालं गोरज मुहूर्ताच्या वेळी.

देह तुळशीचा, वसा चंदनाचा, शब्द करुणेचा,
……. नाव घेते असावा आर्शिवाद सर्वाचा.

शंकरासारखा पिता, गिरजेसारखी माता,
……….. सारखे पती मिळाले स्वर्ग आला हाता.

निळे-निळे डोंगर, हिरवे-हिरवे रान,
…………. चं नाव घेऊन राखते सर्वांचा मान.

संसाररुपी मार्गावर दोन प्रवासी नवे,
………… हेच पती सात जन्मी हवे.

दारातील तुळशीला पाणी घालते गार,
…….. रावांच्या नावाला रात्र झाली फार.

आकाश आले भरुन, चंद्र लपला ढगात,
………… ना हार अर्पण करून धन्य झाले जगात.

सुख समाधान, शांति हेच माझे माहेर,
……… रावांनी केला मला सौभाग्याचा आहेर.

उदार मनाने अहिंसेच्या जगाला करा आहेर,
……..च्या करिता सोडून आले माहेर.

मंगळसूत्र म्हणजे सासर माहेरची प्रीती,
……. मिळाले पती म्हणून आभार मानू किती.

मंडपाला सोडल्या कमानी त्यावर विजेची रोषणाई,
………चे नाव ऐकण्याची एवढी कसली घाई.

गणेशाचे आगमन शुभकार्याची खूण,
………. चं नाव घेते तुमचा मान राखून.

आकाशाच्या पोटी चंद्र सूर्य तारांगणे,
……. च नाव घेते तुमच्या आग्रहाने

नाव घ्या, नाव घ्या आग्रह असतो सर्वांचा,
……. च नाव असते ओठी पण प्रश्न पडतो उखाण्याचा

लावीत होते कुंकू, त्यात सापडला मोती,
…… पति मिळाले म्हणून भाग्य मानू किती

15 ऑगस्ट 26 जानेवारी राष्ट्रीय सणाचे दिवस,
……. पती मिळावे म्हणून खूप केले नवस

परिजात अंगणात, रांगोळी दारात,
…… च नाव घेते…… च्या घरात

गरिबीची करू नये निंदा, श्रीमंतीचा करू नये गर्व,
…… पती मिळाले यात आले सर्व

मंगळसूत्राच्या वाटीत संगम सासर-माहेरचा,
…… नाव घेऊन मान राखते सर्वांचा

मनी मंगळसूत्र सौभाग्याचे खूण,
…… च नाव घेते…… यांची सून

घराला असावे अंगण, अंगणात शोभावी तुळस,
……. नाव घेते हळदी कुंकुवाच्या वेळेस

पाकळी पाकळी उमलून फुल घेतं आकार,
…… सारखे पती मिळाले स्वप्न झाले साकार

पायातल्या जोडव्यात माहेरची स्मृती,
…… मिळाले पती म्हणून आभार मानू किती

रुपयाच्या वाटीत सोन्याचा चमचा,
…… नाव घेऊन आशीर्वाद मागते सर्वांचा
